स्ट्रॉग रूम परिसरात कोणी फिरकल्यास थेट गोळ्या घाला-जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

0

नवी दिल्ली-मध्य प्रदेश विधान निवडणुकीच्या मतदानानंतर मतदान यंत्रावरून राजकारण तापले आहे. काही ठिकाणी मतदान झाल्यानंतर तब्बल ४८ तास उशिरा मतदान यंत्र स्ट्रॉग रूम पोहोचले. तसेच काही ठिकाणी सीसीटीव्ही बंद होते, यावरून कॉंग्रेसने भाजपवर छेडछाडीचा आरोप करत संशय व्यक्त केला आहे. दरम्यान रीवा येथील जिल्हाधिकारी प्रीति मैथिल यांनी ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेबाबत कडक बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहे. स्ट्रॉग रूम परिसरात कोणी संशयित फिरकतांना दिसल्यास थेट गोळ्या घाला असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

माझ्या २५ वर्षाच्या नोकरीचे १० वर्ष संपले आहे. या निवडणुकीत अशा घटनेमुळे मी माझी सेवा खराब करू इच्छित नाही असे खडे बोल त्यांनी प्रशासनाला सुनावले.