स्ट्रोक आजारापासून 3 वर्षीय चिमुरडीची मुक्तता

0

मुंबई : केंद्राने अलीकडेच 3 वर्षांच्या बालिकेतील पक्षाघात (स्ट्रोक) च्या दुर्मिळ आजारावर उपचार करुन त्यांना जिवनदान दिले आहे. न्यूरोइंटरव्हेन्शन उपचार व 90 हून अधिक दिवसांचा रिकव्हरी कालावधी यानंतर बालिका निरोगी व आनंदी आहे.

आणीबाणीच्या स्वरूपात आलेल्या या बालिकेला सर्वप्रथम स्ट्रोक स्पेशालिस्टने पाहिले. परंतु, इतक्या लहान बालिकेमध्ये स्ट्रोकचे निदान होण्याची दुर्मिळता विचारात घेऊन पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट व एपिलेप्टोलॉजिस्ट यांचाही सल्ला घेण्यात आला व त्यांनी स्ट्रोकच्या सुरुवातीच्या लक्षणांना दुजोरा दिला. एमआरआय चाचण्यांतून स्ट्रोक असल्याची खात्री झाली. बालिकेला हार्ट इन्फेक्शन असल्याचे व त्यामुळे हार्ट व्हॉल्व्हवर व्हेजिटेशन वाढल्याचे व ते रक्तात मिसळल्याचे उपचार करताना निदर्शनात आले. या बालिकेच्या बाबतीत एक व्हेजिटेशन फुटले व मेंदूपर्यंत पोहोचले व यामुळे स्ट्रोक आला होता.

डॉक्टरांची माहिती
इंटरव्हेन्शनल न्यूरोरेडिऑलॉजी हेड डॉ. मनीष श्रीवास्तव यांनी सांगितले, देशातील स्ट्रोकवरील उपचार जागतिक मापदंडापेक्षा फार कमी आहेत. लहान मुलांच्या बाबतीत ते प्रकर्षाने जाणवते. कारण, लहान मुलांच्या बाबतीत लक्षणे ओळखणे अतिशय अवघड असते व मुलांना त्यांच्या समस्या प्रौढांप्रमाणे योग्य प्रकारे सांगता येत नाहीत. या रुग्णालयामध्ये अवलंबल्या जाणार्‍या स्ट्रोक उपचारांच्या प्रोटोकॉलमुळे व स्पेशालिस्ट टीमच्या सहयोगामुळे आम्हाला या केसच्या बाबतीत वेगाने निदान करता आले. रुग्णाची रिकव्हरी पूर्ण झाल्याची खात्री करण्यासाठी आम्ही रुग्णाच्या रिकव्हरीची तीन महिने अधिक कालावधी पाहणी केली.