स्तनपानाने कमी होतो कर्करोगाचा धोका

0

चिबंळी। बाळ जन्माला आल्याबरोबर स्तनपान नियमित व व्यवस्थित करविल्यास मातेला स्तनाचा आणि गर्भशयाचा कर्करोग धोका कमी होतो व प्रसुतीनंतर येणारा ताण आणि मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. अशी माहिती आरोग्य सेविका आर एम जाधव यांनी चिंबळी येथील महिलांना दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र कंरजविहिरे अतंर्गत प्राथमिक उपकेंद्र चिंबळी (ता खेड )येथे वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेश ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली गर्भवती महिलांसाठी स्तनपान सत्पाहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

यांचे मार्गदर्शन
सरपंच रेशमा सोनवणे, अंगणवाडी सेविका गायत्री लोखंडे, लता काळोखे, शोभा परदेशी, अश्विनी सोनवणे व महिला मोठ्या सख्यंने उपस्थित होत्या या वेळी आरोग्य सेविका जाधव म्हणाल्या की अतिसार झाल्यावर ओ आर एस चे द्रावण तयार करून ते द्रावण 24 तासाच्या आत उपयोगात आणणे व गरोदरपणात महिलांनी मोड आलेले कडधान्य व पालेभाज्या खाव्यात त्यामध्ये बीट गाजर टोमॅटो भोपळा हा आहार नियमितपणे घ्यावा.