मुंबई । उषालक्ष्मी स्तन कॅन्सर फाऊंडेशन द्वारे आयोजित कार्यक्रमात बॉलीवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन यांना जगातील पहिल्या स्तन कॅन्सरवर आधारित असलेल्या मोबाईल अॅपचे अनावरण केले. या कार्यक्रमाचे आयोजन जुहू येथील जे.डब्ल्यू मेरेटियल हॉटेलमध्ये करण्यात आले होते.
उषालक्ष्मी स्तन कॅन्सर फाऊंडेशन द्वारे अनावरण करण्यात आलेले हे मोबाईल अॅप ग्राहक अॅपल्ल किंवा एनड्रॉइड मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करू शकतात.
हे अॅप मध्ये 12 भाषांचा ( मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती पंजाबी, बंगाली, कन्नड, मल्ल्याळम, तेलुगु, ओरिसा आसामी, तमिळ, इ. )समावेश आहे. जेणे करून, ग्राहकांना आपापल्या भाषेत याचा वापर करणे सोपे जाईल. या अॅपच्या माध्यमातून स्तनांच्या आरोग्याबाबतीतील प्रत्येक समज-गैरसमजांचे निवारण करण्यात येणार आहे. तसेच आपल्या राष्ट्राला आरोग्याच्याबाबतीत सशक्त करण्याच्या हेतूने ह्या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.