थाळनेर । थाळनेर गावात रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. खराब रस्त्यांमुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. यामुळे गावकर्यांना त्रास सोसावा लागत असून संताप व्यक्त केला जात आहे. गावकर्यांनी ह्या समस्यांचे निराकारण व्हावे यासाठी ग्रामसभा व अन्य तक्रारी करून लक्ष वेधले आहे. मात्र सरपंच या लोकांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. गावात पाणीपुरवठा योजनेअंर्तगत नवीन पाईपलाईन व पाण्याचा टाक्या मंजूर झाल्या आहेत.त्यामूळे ते काम पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे रस्ते तयार हाऊ शकत नाहीत. कारण पूर्ण रस्ते तोडून पाईपलाईनचे काम होणार असल्याचे सरपंचांनी सांगितले. लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.