स्त्रीशक्तीचा कलाविष्कार

0

मुंबई । जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई व इतर राज्यातील नामवंत व गुणवान अशा 30 महिला चित्रकारांनी एकत्रितपणे सादर केलेला त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्र व शिल्पाकृतींचा अनोखा आविष्कार एंपॉवरमेंट या शीर्षकांतर्गत ऑपेरा हाऊस येथील चौपाटीजवळ असलेल्या बॉम्बे म्यूचुअल टेरेस बिल्डिंग मधील प्रसिद्ध डीडी नेरॉय आर्ट गॅलरीत पाहायला मिळणार आहे. हे प्रदर्शन 8 ते 15 मार्च या कालावधीत भरविण्यात येणार असून 11 ते 7 या वेळेत रसिकांना पाहता येणार आहे. हया प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. उमा रेळे (प्रिन्सिपल, नालंदा नृत्यकला महाविद्यालय), डॉ. किशु पाल (भरतनाट्यम, कुचीपुडी विशारद), अभिनेत्री रश्मी पित्रे यांच्या हस्ते होणार आहे.

आयोजक गायत्री देसाई यांनी भारतातील विविध प्रदेशातील भिन्न संस्कृती व कलात्मक अभिव्यक्ती असणार्‍या 30 महिला चित्रकारांना एकत्र आणून त्यांनी तयार केलेल्या चित्र व शिल्पाकृती या प्रदर्शनात सादर केल्या आहेत. एंपॉवरमेंट या चित्रप्रदर्शनात अमीषा मेहता, अनघा देशपांडे, चेतना सुदामे, देबाजानी भट्टाचार्य, देवांगना छाब्रिया, दीपिका टोपीवाला, फिलोमिना पवार, जयश्री राव, खुशबू मदनानी, मंजुशा गांगुली, मनीषा वेदपाठक, नमिता कोलही, नेहा नागडा, रुकसाना तबस्सुम, प्रणाली हरपुडे, पुर्णिमा दाभोळकर, राधिका पोवार, रश्मी पित्रे, डॉ रुता इनामदार, सोनल गांधी, सोनम गुप्ता, सुक्रीती दत्त, सुमना नाथ डे, सुनीता फरकिया, सुरभी खन्ना, तेजश्री प्रधान, वरणीता सेठी, विम्मी मनोज, विनीता रूपाणी आणि झरणा दोशी या 30 महिला चित्रकर्तींचा समावेश असून त्यांनी सादर केलेला हा सौंदर्यपूर्ण, बोलका व कलात्मक आविष्कार सर्वांना आवडेल असाच आहे.