चाळीसगाव येथे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्याहस्ते झाला गौरव
चाळीसगाव – जगात 2020 साली भारत मधुमेहाची राजधानी होणार, असा डांगोरा गेली 10वर्षे पिटला जात होता. पण मधुमेह हा खरं तर आहारातील अनियमितपणा, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव अशा जीवनशैली बदलल्यामुळे होणारा शरीर पोखरणारा आजार. वैद्यकीय व्यावसायिक आणि स्वतः रुग्ण दोघांनाही हा आजार गोळ्या औषधं घेऊन फक्त नियंत्रित करता येतो पण पूर्ण बरा होत नाही हे मान्य आहे. मात्र माजी मंत्री डॉ.श्रीकांत जिचकार यांची दिवसातून दोन वेळाच जेवण्याची जीवन पद्धती सापडली त्याची अंमबजावणी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणारे डॉ.क.रं.बळेकर यांना त्यामुळेच अभियानाचा मिशनरी पुरस्कार दिला जातो आहे, असे गौरोद्धार सर्वच मान्यवरांनी व्यक्त करून डॉ जग्गनाथ दीक्षित यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यांची होती उपस्थिती
स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व अभियान अंतर्गत पुस्तक प्रकाशन आणि महोत्सवी व्याख्यान सोहळा षण्मुखानंद हॉल मुंबई येथे नुकताच आयोजित केला होता. यावेळी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात सोशल व प्रीव्हेंटिव्ह मेडिसिन शिकवणार्या डॉ.जगन्नाथ दीक्षित, डॉ.अंजली दीक्षित, अभियानाचे उपाध्यक्ष बाळासाहेब कदम, टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक प्रफुल्ल मार्फतवार, डॉ. तुषार बंडगर ,( डायबेटोलॉजिस्ट आणि एन्डोक्रिनोलॉजी विभाग प्रमुख, केईएम हॉस्पिटल मुंबई), अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी, अभिनेत्री अर्चना पाटकर,मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजन वेरुळकर यांची उपस्थिती होती.
देशात अभियानाला वाढता प्रतिसाद
माजी मंत्री श्रीकांत जिचकार यांनी 2012 साली स्थूलत्व आणि मधुमेह निवारण अभियानाची सुरुवात केली. सोशल मीडियाचा आदर्श उपयोग करून आत्ता हे अभियान 200हून अधिक व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून 37 देशात लाखो लोकांपर्यंत पोहोचले आहे. त्याचं रूपांतर आता ’स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व अभियान’ यात झालं असून डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्या माध्यमातून ते देशातील घराघरात पोहोचले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.