जळगाव । भारतीय नरेंद्र मोदी संघ राज्यातील प्रमुख शहर व ग्रामीण भागात मधुमेह व संधीवात मुक्त अभियान राबविणार असून त्याच बरोबर स्त्री शक्ती सबलीकरण योजना हाती घेण्यात असल्याची माहिती भारतीय नरेंद्र मोदी महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री श्री 1008 महामंडलेश्वर आयुर्वेदाचार्य स्वामी ब्रम्हांडपुरी महाराज (दहिगाव संत ता. पाचोरा) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. भारतीय नरेंद्र मोदी संघाची स्थापना धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी करण्यात आली असून त्या अंतर्गत मधुमेह व संधीवात मुक्त अभियान लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तसेच स्त्री शक्ती सबलीकरण योजना समाजातील तळागळातील सर्व घटकांपर्यंत राबविली जाणार आहे. याशिवाय केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम भारतीय नरेंद्र मोदी संघामार्फत केले जाणार असल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी केली.इ या पत्रकार परिषदेत संघाच्या जिल्हाध्यक्षपदी पंकज जैन यांची नियुक्ती घोषित करण्यात आली. तसेच इतर पदाधिकार्यांमध्ये सुनिल श्रीश्रीमाळ, ईश्वर छाजेड, डिगंबर भोकरे यांचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. भारतीय नरेंद्र मोदी संघाच्या प्रदेश मिडीया प्रमुखपदी पत्रकार रविंद्र नवाल यांची नियुक्ती करण्यात आली. या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय अध्यक्ष मनोजसिंह तोमर, प्रदेशाध्यक्ष नरेंद्र खंडेलवाल, प्रदेश उपाध्यक्ष विद्याधर पाटील, अ.भा. मंत्री प्रंदीपसिंह निर्वाण, राष्ट्रीय कोषाध्यक्ष मनोजकुमार शर्मा, ठाणे (मुंबई) प्रभारी मनोज गुप्ता, आय.टी. मुख्य दिनेश गांधी यांची उपस्थिती होती.