आळंदी : शिरूर लोकसभा मतदारसंघातील चाकण, आळंदी, रांजणगाव, वाघोली एमआयडीसीत विकसित होत असलेल्या कंपन्यांमध्ये स्थानिकांना कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे. या विषयासंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन त्यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख राम गावडे उपस्थित होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सकारात्मक भूमिका दर्शवत, स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.