जळगाव : धरणगाव पिंप्री रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी कारमधून वाहतूक होत असलेला 5 लाख 86 हजार 34 रुपये किमतीचा गुटखा पकडला आहे. रवींद्रसिंग राजपूत (24) असे संशयिताचे नाव असून त्याच्याविरुध्द धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी कि एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना गुप्त माहिती वरून महेंद्रा लोगान या कारमधून अवैधरित्या गुटखा नेत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सापळा रचून महेंद्रा लोगान (क्र. एमएच -18 डब्ल्यू 4335) या पांढर्या रंगाच्या कारमध्ये हॉटेल साई समोर रस्त्याच्या कडेला थांबले होते. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास कार चालक रवींद्रसिंग राजपूत वय 24 याची विचारपूस केली. कारची तपासणी केली असतात त्यात डिक्कीमध्ये 5 लाख 86 हजर 34 रुपयांचा गुटखा गोण्यांमध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आला. कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रवींद्रसिंग राजपूत यांला ताब्यात घेतले आहे. रविंद्रसिंग रहिवासाचा पत्ता तो कधी जळगाव तर कधी धरणगाव सांगत होता.
या पथकाने केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले , अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, सहायक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू रोहम , सपोनि महेश जानकर , पोहेकॉ रवींद्र घुगे, विनायक पाटील, प्रमोद लाडवंजारी, इद्रिस पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली .