स्थानिक गुन्हे शाखेचे किरणकुमार बकाले नवीन पोलीस निरिक्षक ; पदभार स्विकारला

0

जळगाव :- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू गंगाधर रोहम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. रोहम यांच्या जागी पोलीस निरिक्षकपदी किरणकुमार बकाले यांची नियुक्ती झाली आहे. किरणकुमार बकाले यांनी शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पदाचा पदभार स्विकारला आहे.

मेहुणबारे येथील लाखोंच्या गुटखा प्रकरणात यापूर्वीच पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या 7 पोलिस कर्मचार्यांसह मेहुणबारे येथील सहायक पोलिस निरीक्षक यांना निलंबित केले आहे. याच गुटखा प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांची उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा आहे. रोहम यांच्या जागी किरणकुमार बकाले यांची नियुक्त झाली आहे. बकाले यांनी शनिवारी सायंकाळी आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे.