भुसावळ। दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राची उभारणी करतांना येथील मिलिंद नगर व भीम नगरमधील रहिवाशांनी पाया उभारणीचे काम केले होते.
त्यामुळे या परिसरातील बेरोजगारांना रोजगार देण्याची मागणी राष्ट्रीय मजदूर सेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे. यात नमूद करण्यात आले की, बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी जगन सोनवणे व हरिष सुरवाडे यांच्या नेेतृत्वात वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. त्यानंतर कपिलवस्तू नगर बसविण्यात आले.
कराराचे पालन करावे
याप्रसंगी मिलिंद नगर व भीम नगरचे स्थलांतर होवून येथील रहिवासी कपिल वस्ती नगर येथे रहिवास करु लागले. दिपनगर प्रशासनासोबत नोकरी मिळण्याचा करारदेखील यावेळी करण्यात आला होता. मात्र अद्यापही त्याचे पालन करण्यात आले नसल्याने प्रशासनाने याची दखल घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
यांची होती उपस्थिती
तसेच स्थानिक भुमिपुत्रांना डावलण्यात येवून उत्तर प्रदेेश आणि बिहार येथील परप्रांतीय कामगार आयात केले जात आहे. त्यामुळे येथील बेरोजगारी दूर करण्यासाठी दिपनगर प्रशासनाने केंद्रापासून पाच किलोमिटरमधीलच बेरोजगारांना रोजगार द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर हरिष सुरवाडे, सोमा जमदाडे, समाधान वाघ, सोपान गायकवाड, हिरामण मगरे, विजय खराटे, वनिता सुरवाडे, इंदू गवई, प्रल्हाद गायकवाड, सिताराम मेढे, समाधान सुरवाडे, कुंदन इंगळे, अजय इंगळे, रोहित सुरवाडे यांच्या स्वाक्षर्या आहे.