जळगाव । अमृत योजनेंतर्गत उद्यान विकासीत करण्यासाठी शासनातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या लॅण्डस्केप विकसक आराखडा तयार करण्यास दिरंगाई करीत आहेत. त्यामुळे त्यांना बदलवून स्थानिक वास्तुविशारद यांच्याकडे काम देण्याच्या मागणीसाठीचे पत्र मनपाने शासनाला दिले आहे. अमृत योजनेंतर्गत जळगाव शहरात चार उद्याने तयार करण्यात येणार आहे.
तलावालगत वृक्ष लागवड
अमृत योजनेंतर्गत पाच वर्षापर्यंत उद्यान विकसीत करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. सन 2015 ते 18 तीन वर्षात साडे चार कोटी निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरात चार उद्यान विकसीत केले जाणार आहे. परंतु उद्यानात शासनाच्या निकषानुसार सर्वच झाडे लावणे शक्य होणार नाही. त्यामुळे प्राप्त निधीतून मेहरुण तलावाच्या सभोवताल 25 फुट जागा सोडून वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी मंजूरी देखील घेण्यात आली आहे. मेहरुण तलावाच्या बाजूला मातीचा जॅगींग ट्रॅक, त्याच्या बाजूला पेवरब्लॉकने तयार केलेला जॅगींग ट्रॅक आणि नागरिकांना बसण्यासाठी बाकडे ठेवण्यात येणार आहे. तसेच ओपन जीम देखील प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली.