पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 14 कोटी 76 लाख 4 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी सभा सभापती ममता गायकवाड यांच्या उपस्थितीत बुधवारी झाली. जिजामाता पिंपरी, आकुर्डी, मासुळकर कॉलनी आदी रुग्णालयासाठी इटीएफ येणा-या सुमारे 3 कोटी 89 लाख 75 हजार रुपयांच्या खर्चास, ‘इ’क्षेत्रीय कार्यालया मार्फत भोसरी स्पर्धा परिक्षा केंद्राकरीता पुस्तक खरेदीकामी येणा-या सुमारे 47 हजार रुपयांच्या खर्चास, महापालिकेच्या श्री भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय भोसरी करीता पुस्तक खरेदीकामी येणा-या सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.रावेत जलउपसा केंद्र व्ही.टी पंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी 45 लाख 13 हजार रुपये, रस्ते डांबरीकरणासाठी 41 लाख 85 हजार रुपये, म्हेत्रेवस्ती व इतर परीसरातील रस्त्यांचे डांबरीकरण विषयककामे करण्यासाठी येणा-या सुमारे 1 कोटी 44 लाख रुपये, मनपातील उदवाहकाच्या दुरुस्तीसाठी 2 लाख 96 हजार, पीएमपीएमएल संस्थेस विविध प्रकारचे पासेसपोटी रक्कम रूपये 48 लाख 79 हजार रुपयांच्या खर्चास, महापालिकेचे अद्यावत प्रायमरी डाटा सेंटर नव्याने कार्यान्वित ठेवणेकामी रक्कम रूपये 12 लाख 95 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.