स्थायीत विशेष निधीतून काम करण्याचा ठराव मंजूर

0

जळगाव : अमृत योजनेची टेंडर प्रक्रीयेत एका मक्तेदाराने आक्षेप घेतल्याने लांबणिवर पडलेली आहे. त्याचत ही अमृत योजना सुरू होण्याचा काळ निश्‍चित नसल्याने विशेष निधी व किरकोळ कामांची वर्क ऑर्डर देण्याची सूचना नितीन बरडे यांनी स्थायी सभेत मांडली. महानगर पालिकेच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली. याप्रसंगी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव निरंजन सैंदाणे उपस्थित होते. या विशेष निधीतून 18 कोटी 25 लाखांची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. यानिधीतून दलितवस्ती सुधारणा, छोटे मोठे रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. विशेष निधीतून होणारी कामें त्वरीत सुरू करण्याचा ठराव करण्यात आला.

अधिकार्‍यांची टोलवाटोलवी
दरम्यान, महानगर पालिकेमार्फेत शहराती 18 वार्डांची साफसफाईंची कामे मक्तेदारांमार्फेत करण्यात येत आहे. जर या वार्डांमधील मक्तेदारांनी अचानक काम बंद केल्यास उपाययोजना म्हणून तात्काळ काम सुरू करण्यासाठी वार्षिक भाडे तत्वावर वाहन लावण्यासाठी ई निविदा प्रसिद्धीसाठी प्रशासनाकडून प्रस्ताव स्थायी सभेत ठेवण्यात आला होता. याबाबत चर्चा सुरू असतांना महास्वच्छता अभियान राबवून देखील शहरातील काही भागांमध्ये स्वच्छता झालेली नसल्याने स्थायी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तर सभापती वर्षा खडके यांनी शाहूनगर हे मध्यवर्ती ठिकाणी असून देखील तेथे स्वच्छता नसल्याचे आरोग्य अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी भाजपाचे पृथ्वीराज सोनवणे यांनी महानगर पालिकीचे 6 स्कीप लोडर बंद असल्याने वार्ड. क्र. 29 अमध्ये गेल्या महिन्यांपासून कचर्‍यांचे कंटनेर उचलले गेले नसल्याचे सांगितले. याला जबाबदार कोण आहे असा प्रश्‍न सोनवणे यांनी उपस्थित केला. यावेळी खाविआचे नितीन बरडे यांनी ठेकेदाराविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई न झाल्यास अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची सूचना देण्यात करण्यात आली. आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी स्कीप लोडर बंद असण्यासी माझा संबंध नाही तर ते वाहन विभागाचे काम असल्याचे सांगून त्यांनी आपले हात झटकले.

दरनिश्‍चितीत तफावत
महानगर पालिका हद्दीतील संपुर्ण मालमत्तेचे जी.आय.एस.द्वारे सर्वेक्षण करण्याबाबतचा प्रशासनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी पृथ्वीराज सोनवणे यांनी सर्वेक्षण करतांना 96 हजार 945 प्रॉपर्टींज निश्‍चित केलेले आहे. हा आकडा कशाच्या आधारावर निश्‍चित करण्यात आला आहे याची विचारणा केली. दर निश्‍चिती करतांना तफावत होत असून दर सर्व्हेक्षणाचे दर जास्त होत असल्याने महानगर पालिकेच्या कर्मचार्‍यांमार्फेतच सर्वेक्षण करण्यात यावे अशी सूचना पृथ्वीराज सोनवणे यांनी मांडली. तसेच या ठरावास सोनवणे यांनी विरोध केला. सदर ठरावास भाजपाचा विरोध असल्याने ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.

खाजगी संस्थेची जाहिरात मनपा कार्यालयावर
सागर पार्क येथील महानगर पालिकेच्या कार्यालयावर खाजगी संस्थेची जाहीरात लावण्यात आलेली आहे. याबाबत पृथ्वीराज सोनवणे यांनी नाराजी व्यक्त केली. महानगर पालिकेच्या कार्यालयावर जाहीरात लावण्यात येते तरी कार्यालयातील कर्मचार्‍यांचे त्याकडे लक्ष का नसते असा प्रश्‍न उपस्थित केला. जाहिरात लावतांना महानगर पालिकेची परवानगी घेण्यात आली होती का याची विचारणा देखील सोनवणे यांनी यावेळी केली.