पिंपरी। महापालिकेच्या स्थायी, विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सदस्यांची निवड गुरुवारी करण्यात आली. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नवनिर्वाचित सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. नवनियुक्त सर्व सदस्यांचे महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त दिनेश वाघमारे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सह आयुक्त दिलीप गावडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसचिव उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले.
स्थायीचे सदस्य असे
स्थायी समिती सदस्यपदी लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, सीमा सावळे, उत्तम केंदळे, उषा मुंढे, माधुरी कुलकर्णी, हर्षल ढोरे, निर्मला कुटे, कोमल मेवानी, आशा धायगुडे-शेंडगे, अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, अमित गावडे, कैलास उर्फ बाबा बारणे यांची निवड जाहीर करण्यात आली.
विषय समिती सदस्यांची नावे अशी
विधी समिती सदस्यपदी शारदा सोनवणे, अश्विनी जाधव, स्वीनल म्हेत्रे, सुरेश भोईर, शितल शिंदे, स्वाती (माई) काटे, संतोष कोकणे, जावेद शेख, मीनल यादव. महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यपदी सागर अंघोळकर, वैशाली घोडेकर, योगिता नागरगोजे, सुनिता तापकीर, प्रा. सोनाली गव्हाणे, चंदा लोखंडे, सुलक्षणा धर, निकिता कदम, रेखा दर्शले. शहर सुधारणा समिती सदस्यपदी सागर गवळी, शशिकांत कदम, विकास डोळस, संतोष कांबळे, शैलेश मोरे, मयुर कलाटे, गीता मंचरकर, विनया तापकीर, अश्विनी वाघमारे. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सदस्यपदी अंबरनाथ कांबळे, राजेंद्र गावडे, भीमाबाई फुगे, बाळासाहेब ओव्हाळ, लक्ष्मणशेठ सस्ते, मंगला कदम, डब्बू आसवानी, राजू बनसोडे, सचिन भोसले यांची निवड जाहीर करण्यात आली.