स्थायी सभेत सदस्यांचा आरोप

0

धुळे । महापालिकेच्या आरोग्य विभागातंगर्त यणेार्या मलेरिया विभागातील कर्मचारी व कामगारांच्या पगारापोटी तरतूद निधीच्या अतिरिक्त 60 लाखाची मंजूरी मिळवणे म्हणजे महापालिकेची लूट होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी स्थायी सभेत केला. महापालिकेच्या सभागृहात दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी उपायुक्त रवींद्र जाधव, प्रभारी नगर सचिव मनोज वाघ अधिकारी वर्ग तसेच स्थायी समिती सदस्य कमलेश देवरे, साबीर मोतेब्बर, संजय गुजराथी, नानाभाऊ वाघ, गुलाब माळी, दीपक शेलार, मायादेवी परदेशी, वालीबेन मंडोरे, इंदूबाई वाघ आदी सदस्या उपस्थित होत्या.

60 लाख खर्चाचा अट्टाहास का?
या तरतूदीमध्ये 66 कामगार व कर्मचारी वर्ग हा शहरातील स्वच्छता व आगामी पावसाळ्यातील रोगराई प्रतिबंध करण्यासाठी पुरेसा आहे.असे असतांना आजच्या सभेत मलेरिया विभागातील कामगारांच्या पगारापोटी 60 लाख खर्चाचा अट्टाहास का? असा प्रश्‍न उपस्थित करुन संजय गुजराथी यांनी आर्थिक खर्चापोटी तरतूद करुन भविष्यात मनपाची आर्थिक लूट करण्याची व्यवस्था करु नका, असे सांगितले. यावर प्रशासनाने खुलासा करतांना सांगितले की, एक कोटी 86 लाख 33 हजार रुपयांची तरतूद मलेरिया विभागात कर्मचारी, कामगार यांच्या पगारापोटी करण्यात आली असून हि रक्कम शासन देत असते.

पाठपुरावा करुनही या समस्या अद्याप तशीच
प्रभागात पिण्याच्या पाण्याची व गटारीची समस्या असतांना याबाबत वारंवार मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. या विकासात्मक कामांचे दर मंजुरी नाही. कार्यादेश नाहीत आणि स्थायीच्या सभेत झालेल्या कामांना कार्योत्तर मंजुरी कशी दिली जाते? असा प्रश्‍न उपस्थित करुन नगरसेवक साबीर मोतेब्बर यांनी प्रभागातील समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी या सभेत केली. तसेच मनपा प्रशासनावर दफ्तर दिरंगाईचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पुढे ते म्हणाले की, बांधकाम मंजूरी, पाणी पुरवठ्याचे नियोजन आदी कामांसदर्भात विभाग प्रमुख तसेच अधिकार्यांकडे वारंवार पाठपुरावा करुनही वेळेत कामे होत नाहीत. या कामांच्या फाईल्स टेबलांवर जैसे-थे अवस्थेत पडलेल्या असतात. संबंधित अधिकारी याबाबत समाधानकारक उत्तरं देत नाहीत. तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस कामांत दिरंगाई करणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी साबीर मोतेब्बर यांनी केली. या पुढे दफ्तर दिरंगाई केल्यास संबंधित विभाग प्रमुखांना व अधिकार्यांना दंड ठोठविण्यात येईल, असे निर्देश यावेळी उपायुक्त रवींद्र जाधव यांनी दिले. नगरसेविका मायादेवी परदेशी म्हणाल्या की, पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूची आदी रोगांची साथ पसरु नये, यासाठी मलेरिया विभागाने दक्षता घ्यावी.

पावणे दोन कोटींची तरतूद
अर्थसंकल्पात अगोदरच पावणे दोन कोटींची तरतूद करण्यात आली असतांना आता पुन्हा त्याच विभागात कामगार पुरविण्यासाठी 60 लाख रुपयांचा विषय मंजूरीसाठी घेतला जात असून ही महापालिकेची लूट होत असल्याचा आरोप स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला. तर दफ्तर दिरंगाईचा आणि विकास कामांच्या कार्योत्तर मंजुरीचा मुद्दा मांडून सदस्यांनी संबंधित अधिकार्यांवर कारवाईची मागणी केली.मनपातील आरोग्य,मलेरिया विभागासाठी कामगार पुरविणेबाबत निवीदाचा विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आला होता. दरम्यान नगरसेवक संजय गुजराथी यांनी या विषयावर आक्षेप घेतला. मलेरिया विभागासाठी कामगारांच्या पगार खर्चापोटी 1 कोटी 86 लाख 33 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.