पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी होणार उपयोग
सार्वजनिक शौचालयांची स्वच्छतेसाठी 56 लाखांचा निधी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणार्या सुमारे 57 कोटी 64 लाख 45 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात मंगळवारी झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. ‘ग’ क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील सार्वजनिक शौचालय व मुतार्यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करणेकामी येणार्या सुमारे 56 लाख, राष्ट्रीय कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेकामी आवश्यक असणार्या 13 टाटा सुमो अथवा तत्सम वाहन भाडे तत्वावर घेणेकामी येणार्या सुमारे 1 कोटी 12 लाख 78 हजार रुपयांच्या खर्चासह स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.8 येथील तिरूपती ते स्पाईन रोड ते आर.टी.ओ कॉर्नर पर्यंत रस्ता दुभाजक करणे व स्थापत्यविषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे 68 लाख 42 हजार रुपयांच्या खर्चास, वाकड येथील पुणे-बेंगलोर महामार्गावरील पूलापासून हिंजवडी मनपा हद्दीपर्यंत रस्ता रूंदीकरण करणेकामी सुमारे 20 कोटी 55 लाख 29 हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्रमांक 5 गवळीनगर व सँडवीक परिसरीमध्ये डांबरीकरण करणेकामी येणार्या सुमारे 68 लाख 60 हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
हे देखील वाचा
डीपी रस्त्यासाठी 16 कोटी
चर्होली येथील मुख्य रस्ता ते काळजेवाडी पर्यंतचा 18 मीटर डीपी रस्ता विकसित करण्यास सुमारे 16 कोटी 34 लाख 53 हजार रुपयांच्या खर्चास, ‘ड’ क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील सर्व कचरा कुंड्या, रस्त्यांचे, गटाराच्या कडेचे, कचर्यांचे ढीग, मोकळ्या जागेतील कचर्यांचे ढीग उचलणे व मोशी कचरा डेपो येथे टाकणे या कामासाठी येणार्या सुमारे 60 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ब क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील म.न.पा.च्या वाहनांमार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेण्यासाठी कामगार पुरविण्यासाठी येणार्या सुमारे 99 लाख 35 हजार रुपयांच्या खर्चास, फ क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील म.न.पाचे टाटा एस वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी कामगार पुरविणे कामी करण्यासाठी येणार्या सुमारे 96 लाख 43 हजार रुपयांच्या खर्चास, अ क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील म.न.पाचे टाटा एस वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेण्याच्या कामासाठी कामगार पुरविण्यासाठी येणार्या सुमारे 1 कोटी 7 लाख 13 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
रस्ते डांबरीकरणासाठी 1 कोटी
ड क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील म.न.पाचे टाटा एस वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेण्याच्या कामासाठी कामगार पुरविणे कामी करणेकामी येणार्या सुमारे 1 कोटी 27 लाख 22 हजार रुपयांच्या खर्चास, विकासनगर, मामुर्डी, किवळे भागातील रस्ते हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणार्या सुमारे 1 कोटी 56 लाख 92 हजार रुपयांच्या खर्चास, क क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील सार्वजनिक शौचालय व मुतार्यांची यांत्रिकी पध्दतीने व मनुष्यबळाद्वारे साफसफाई, देखभाल व किरकोळ दुरूस्ती करणेकामी येणार्या सुमारे 1 कोटी 17 लाख 65 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.