पुणे । पुणे महापालिकेच्या 2018-19 चे अंदाजपत्रक नुकतेच आयुक्तांनी सादर केले आहे. त्या अंदाजपत्रकारावर स्थायी समिती अभ्यास करत असून त्यामध्ये बदल करून स्थायी समिती 27 फेब्रुवारीला अंदाजपत्रक जाहीर करणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी दिली.
5 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर
2017-2018 या वर्षासाठी 5 हजार 600 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यामध्ये 398 कोटींची वाढ करत स्थायी समितीने 5 हजार 998 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर केले होते. गेल्या वर्षी अंदाजपत्रकात 1700 कोटींची विक्रमी तूट बघायला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त कुणाल कुमार यांनी 5 हजार 379 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
उत्पन्न वाढीचा एकही नवा मार्ग नाही
स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष त्यांच्या कार्यकाळातील शेवटचे अंदाजपत्रक 27 तारखेला सादर करणार आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी 2018-2019 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर मांडला आहे. 5 हजार 379 कोटींचा हा अर्थसंकल्प असून यामध्ये उत्पन्न वाढीचा एकही नवा मार्ग सुचविण्यात आलेला नाही, उलट नागरिकांच्या खिशातून कर रुपातून अधिक पैसे काढण्यासाठीचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे. मिळकत कर आणि पाणीपट्टी यामध्ये 15 टक्क्यांची वाढ आयुक्तांनी सुचविली आहे