स्थायी समितीच्या ठरावाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

0

ठेकेदार लवकरच ब्लॅकलिस्टमध्ये

अधिकार्‍यांचे आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी निविदा काढल्या जातात. ही कामे ठेकेदारांना दिली जातात. असे अनेक ठेकेदार महापलिकेसाठी काम करीत असतात. ठरलेल्या मुदतीमध्ये काम पूर्ण करून देण्याचे बंधन असते. मात्र अनेक ठेकेदार हे स्वतःच्या फायद्यासाठी पालिकेचे नुकसान करीत असतात. त्यांच्यावर कारवाई केली जाते. अशीच क्रिसील संस्था ही महापालिकेच्या हितासाठी काम करत नसून, ठेकेदारांच्या हितासाठी काम करते. त्यामुळे या संस्थेची कामे आहे त्या परिस्थितीत काढून घ्यावीत अशा सूचना स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाला केल्या होत्या. मात्र या ठरावाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. संबंधित कंपनींचे आणि अधिकार्‍यांचे लागेबांधे असल्यामुळेच ठराव अंमलात आणण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची चर्चा महापालिकेत आहे.

महापालिकेच्या महत्त्वपूर्ण योजनांना सल्ला देण्याचे काम क्रीसील संस्था करते. महत्त्वपूर्ण योजनांमध्ये झोपडपट्टी पुनवर्सन, स्वच्छ भारत योजना, अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजना अशा अनेक मोठ्या योजनांचा समावेश आहे. मात्र अनेक वर्षांपासून ही संस्था काम करत असून, ती महापालिकेच्या हितासाठी काम करत नसून, ठेकेदाराच्या हिताचे काम करत असल्यामुळे या संस्थेची कामे आहे त्या स्थितीत काढून घ्यावीत अशा सूचना कऱण्यात आल्या होत्या.

प्रशासनाचे ठरावांकडे दुर्लक्ष
यासंदर्भात माहिती विभागाचे प्रमुख निलकंठ पोमण म्हणाले की, संबंधित संस्थेच्या कामासंदर्भात आणि ठरावासंदर्भात चर्चा केली. प्रशासनाने या ठरावासंदर्भात काहीच सांगितले नाही. त्यामुळे यावर त्यानंतर चर्चा झाली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून स्थायीच्या ठरावांकडे डोळेझाक केल्याचे दिसून येतेय.

अंमलबजावणीसाठ सूचना
स्थायीचे सदस्य विलास मडिगेरी म्हणाले की, आत्तापर्यंत स्थायीने दोन महिन्यांत जे काही ठराव केले आहेत, त्या ठरावांची माहिती, त्याची अंमलबजावणी यासंदर्भात प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे स्थायी समितीने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी होताना दिसून येईल. तसेच संबंधित संस्थेच्या ठरावासंदर्भात प्रशासनाने भूमिका घेतली नसली, तरी संबंधित संस्थेला ब्लॅकलिस्टला टाकणार आहोत.