जळगाव : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही मनपात येवू नये असे आदेश आयुक्तांनी दिले आहे. तसेच संचारबंदी लागू झाल्याने मनपा स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा यांनी घरी बसून कामकाज (वर्क फॉर्म होम)करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या दुसर्या मजल्यावरील त्यांच्या दालनाच्या दरवाज्यावर सूचना चिटकवली असून नागरिकांना संपर्क साधण्यासाठी त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर देखील दिला आहे.