स्थायी समिती सभापतीपदी विलास मडिगेरी यांची निवड !

0

पिंपरी-पिंपरीचिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे विलास मडिगेरी यांची निवड झाली आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार शीतल शिंदे यांनी माघार घेतल्यामुळे मडिगेरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे यांच्यावर 8 मतांनी विजय मिळविला. मडिगेरी यांना 12 तर कलाटे यांना 4 तर मते मिळाली.

HB_POST_INPOST_R_Aस्थायी समिती सभापतीपदासाठी आज  निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी कामकाज पाहिले. स्थायी समितीत दहा भाजप, चार राष्ट्रवादी काँग्रेस, एक शिवसेना आणि एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे.  आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मडिगेरी यांना भाजप सदस्यांची १० मते तर शिवसेनेचे एक आणि अपक्षाचे एक अशी १२ मते मिळाली. शिवसेनेने युतीचा धर्म निभावून भाजपाला मतदान केले.

भाजपच्याच शीतल शिंदे यांनी बंडखोरी केल्याने निवडणूक कमालीची रंगतदार अवस्थेत होती. शिंदे यांनी माघार घेतल्याने मडिगेरी यांचा विजय सुकर झाला.