Molestation Of Woman in Bhusawal Taluka: Accused Arrested भुसावळ : भुसावळ तालुक्यातील एका गावातील 36 वर्षीय महिलेचा स्नानगृहातच आरोपीने विनयभंग केला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात संशयीत इब्राहीम भोजू गवळी (वय 36) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.
स्नानगृहात जावून केला विनयभंग
बुधवार, 24 ऑगस्ट रोजी 36 वर्षीय महिला पहाटे सहा वाजता स्नानगृहात लघू शंकेसाठी गेल्यानंतर आरोपीने महिलेशी अंगलट करीत तिचा विनयभंग केला शिवाय आरोपी इब्राहीम हा पीडीतेचा गेल्या तीन महिन्यापासून शौचास व भाजीपाला घेण्यासाठी जात असतांना पाठलाग करीत होता. याप्रकरणी पीडीीतेच्या तक्रारीवरून इब्राहिमविरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास हवालदार गणेश राठोड करीत आहेत.