राज्यभरातून प्रतिसाद ; दोन दिवस 14 एकांकिकांची भुसावळकरांन मेजवानी
भुसावळ:– शहरातील स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे ‘स्नेहयात्री करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे शनिवार, 10 व रविवार, 11 मार्च रोजी शहरातील श्रीकृष्णचंद्र सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. राज्य स्पर्धेत राज्यभरातून एकूण 14 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचा शुभारंभ 10 रोजी सकाळी 10 वाजता गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या शुभहस्ते होईल.
यांची राहणार उपस्थिती
प्रसंगी राष्ट्रवादी काँगे्रस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, एनआरएमयुचे भुसावल मंडल अध्यक्ष ईब्राहीम खान, बांधकाम व्यवसायीक उमेशजी घुले, जळगांवचे रंगकर्मी रमेशजी भोळे, सांस्कृतिक संचालनालयाचे जळगांव जिल्ह्याचे समन्वयक विनोदजी ढगे, भुसावळचे साहित्यीक व विचारवंत प्रा.जतीन मेढे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. स्पर्धेचा समारोप व पारीतोषिक वितरण सोहळा 11 मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता माजी महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे यांच्या हस्ते होईल. प्रसंगी आमदार संजय सावकारे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, डॉ.प्रदीप नाईक, एनआरएमय, भुसावल मंडल सचिव पुष्पेंद्र कापडे, उद्योजक विश्वनाथ अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.