स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी सादर केला कलाविष्कार

0

भुसावळ । संवाद पथक मोहिमेंतर्गत गोलाणी परिसरातील अंगणवाडीत स्नेेहसंमेलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटन माजी शिक्षिका तायडे यांनी केले. याप्रसंगी परिसरातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपला कलाविष्कार सादर केला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पर्यवेक्षिका रेखा गायकवाड यांनी तर सुत्रसंचालन उज्वला पाटील यांनी केले. याप्रसंगी संवाद पथक मोहिम यशस्वीपणे राबविणे याबाबत कार्यपध्दती व मार्गदर्शन पिंपळगाव येथील पर्यवेक्षिका जयश्री जोशी यांनी केले. तसेच उपस्थित पालकांना मुलांना अंगणवाडीत पाठविण्याचे आवाहन केले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमात अनुष्का परदेशी, अमिता झनके, उर्वी धनोकार, मानव सुरवाडे, राशी बघेले, मानसी धनगर, कुंदन कुळकर्णी, अक्षरा शिंदे, धम्मिका गणवीर, निधी प्रजापती, भावेश अंबेकर, हर्षा मतलानी, आकांक्षा जगताप, हर्षाली अहिरे, शैलजा अधिकारी, गायत्री अहिरे या चिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका आशा जगताप, मिरा सोनार, दिपीका जैन, तसेच मदतनिस लक्ष्मी वानखेडे, विद्या पाटील, आदित्य सोनार यांनी परिश्रम घेतले.