स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा जल्लोष

0

जळगाव : येथील ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर.आर.कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या ‘धमाका’ या स्नेहसंमेलनाचे आयोजन रविवारी करण्यत आले होते. स्रेहसंमेलनात विद्यार्थी-विद्याथ्यार्थिंनीनी सादर केलेल्या बहारदार नृत्याने स्रेहसंमेलात बहार आणली. तर झिंगाट, नटरंग, प्रेम रतन धन पायो, ऐ मेरा दिल अशा एकाहून एक गाण्यांवर विद्यार्थ्यांनी चांगलाच ठेका धरला होता. यातच स्नेहसंमेलनात विद्याथ्यांनी विविध वेशभुषा साकारून त्यांच्या नाटीका सादर करत उपस्थितांचे मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी, प्रा.सुरेश पांडे, दिलीप लाठी, मिलींद लाठी, घनश्याम लाठी, विजय लाठी, आशिष मुंदडा, संजय लाठी, राजा मणियार, जुगलकिशोर राठी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्या सोनाली रेंभोटकर यांनी केले. चंद्रकांत भंडारी यांनी विस्यार्थ्यांना प्रोत्साहनपर विविध उदाहारणे देवून मार्गदर्शन केले.

विविध महापुरुषांच्या वेशभुषा परिधान
स्रेहसंमेलनाची सुरुवात फॅन्सी ड्रेस स्पर्धेने करण्यात आली. यामध्ये विद्यार्थि-विद्यार्थिनींनी विविध महापुरुषांच्या वेशभुषा परिधान केल्या होत्या. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मॉ जिजाऊ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषासह मस्तानी, सुल्तान मिर्जा यांच्या वेशभुषा यावेळी परिधान केल्या होत्या. विद्यार्थ्यानी वारकरी, शेतकरी यांच्या देखील वेशभुषा परिधान करुन राज्यातील शेतकर्‍यांची स्थिती, शेतकरी आत्महत्या या विषयावर भाष्य केले. तर विद्यार्थिनीनी लावणी कलावंताची वेशभुषेतुन त्यांचे दु:ख मांडले.

‘झिंगाट’ वर सगळेच झाले सैराट
गीत गायन व नृत्य स्पर्धेने स्रेहसंमेलनात एकच धमाल आणली. हमारी अधुरी कहानी, गले लग जा, सैराट झालं जी, छूप गये सारे नजारे अशा जुन्या-नव्या गाण्यांची चंगळ बांधली. यासह नृृत्य स्पर्धेत राकेश निकुंभ या विद्यार्थ्यांने सादर केलेल्या ‘झिंग झिंग झिंगाट‘वर उपस्थित विद्यार्थीही बेभान झालेले पहायला मिळाले. यासह इश्कवाला लव, दमा दम मस्त कलंदर या गीतांनी देखील स्रेहसंमेलनात बहार आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वाती पांढरे यांनी तर आभार प्रा.शारदा राणे यांनी मानले.प्रास्ताविक प्राचार्या सोनाली रेंभोटकर यांनी केले. चंद्रकांत भंडारी यांनी प्रोत्साहनपर उदाहारणे देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.