स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी उधळले कलागुणांचे रंग

0

साकेगावच्या श्री स्वामीनारायण गुरुकुलमध्ये स्नेहसंमेलन ; विद्यार्थ्यांनी दिला सामाजिक संदेश

साकेगाव– श्री स्वामीनारायण गुरुकुलमध्ये मंगळवारी स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकार सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळवली. अध्यक्षस्थानी प.पू.के.के.शास्त्री होते. व्यासपीठावर प.पू.बाळकृष्ण शास्त्री, प.पू.हरिप्रकाशदास, ऋषीस्वरुपदास, घनःश्यामस्वामी, शिक्षक परीषदेचे तालुकाध्यक्ष गणेश फेगडे, डॉ.जे.के.भिरुड, शशिकांत कोल्हे आदी उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांनी केला गौरव
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला तसेच विविध गुणदर्शन सादर केले. यावेळी वर्षभरात तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक प्रदीप महाजन, मनोज भोसले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन उपशिक्षिका शीतल मोरे व अर्चना कापुरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी विनोद तायडे व इतर उपशिक्षक व उपशिक्षिका यांनी परीश्रम घेतले.