जुन्नर । जुन्नर तालयक्यातील खानापूर येथील शिवनेरी फाउंडेशनच्या शिवनेरी स्कूलचे विविध गुणदर्शन व वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी जपानी पाहुण्यांनी हजेरी लावली असल्याचे कॅम्पस इन्चार्ज राजेंद्र मुरादे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली. गुणदर्शन कार्यक्रमानंतर वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांची कला पाहून जपानी पाहुणे भारावून गेले होते. याप्रसंगी शिवनेरी फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष शुभंकर कणसे, सचिव सरस्वती कणसे, जपानी पाहुणे तीमियो इसोगाय, हिरागा तेन्सुया, नकामीफ, डॉ. हरी दामले, श्रद्धा कणसे, शिवनेरी फाउंडेशनचे प्राचार्य सुभाष पटले, प्राचार्य पद्मावती, प्रा. अमोल थोरात, प्रा. ज्ञानेश्वर पटाडे, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारीवर्ग व पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.