जळगाव । मू.जे.महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘चैतन्य 2017’ चे उदघाटन 27 जानेवारीला सकाळी 9 वाजता महानगरपालिका आयुक्त जीवन सोनवणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा ‘चैतन्य 2017’ ची तयारी पूर्णत्वास आली असून त्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. यात मनोरंजन समिती, समूह व वैयक्तिक नृत्य समिती, उत्स्फूर्त भाषण, काव्यवाचन व कथाकथन, एकांकिका, प्रश्न मंजूषा, विविध छंद व ललित कला, हास्य प्रधान खेळ, फन्सी ड्रेस, मुल्जियन गायक, गंमत जमंत, चमक दिखलाजा अशा 25 समित्यांचा समावेश आहे. विविध कलागुण सादर करण्यासाठी विद्यार्थी दररोज सराव करीत आहेत. यातच 28 रोजी दुपारी 2 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. ‘चैतन्य 2017’ वार्षिक स्नेहसंमेलनाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा.एन.व्ही. भारंबे, डॉ. देवयानी बेंडाळे, उपप्राचार्य व स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.ए.पी.सरोदे तसेच विविध समित्यांचे चेअरमन व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.