जळगाव । केंद्रीय लोकसेवा आयोगासारख्या परीक्षेत हमखास यश मिळवायचे असेल तर त्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून द्या असे प्रतिपादन यु.पी.एस.सी. उत्तीर्ण आशिष पाटील यांनी केले. जळगांव येथील दर्जी फाऊंडेशन आयोजित विशेष सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. नुकत्याच जाहीर झालेल्या यु.पी.एस.सी. परीक्षेच्या अंतीम निकालातून आशिष पाटील यांनी ए.आर.आय. 330 च्या रँकने यश मिळविले या यशाबद्दल दर्जी फाऊंडेशनतर्फे त्यांच्या सत्कार व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले होते. दर्जी फाऊंडेशनचे संचालक गोपालदर्जी यांनी त्यांचा प्रतिमा देवून सत्कार केला.
यशासाठी झगडायला हवे..
मुळचे चोपडा तालुक्यातील तावसे या छोट्याशा खेड्यात राहून आशिष ईश्वर पाटील यांनी मिळविलेले यशदर्जी फाऊंडेशनमध्ये विद्यार्थ्यांना लक्षात यावे व त्यांनाही प्रेरणा मिळावी म्हणूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.आपल्या परिसरातील वातावरण आणि आहे त्या परिस्थितीला सामोरे जावून नविनतम घडविण्याचा प्रयत्न आपण करायला हवा यामुळे परिस्थिती तर बदल होतोच शिवायआपले आयुष्यही सुखकर होते. अमुक एक वस्तु आपल्याकडे नाही म्हणून मार्ग नबदलविता स्वतःमध्ये बदल घडवून यशासाठी झगडायला हवे. एम.पी.एस.सी.,यु.पी.एस.सी. सारख्या परीक्षेत यश मिळवायचे असल्यास त्यात स्वतःला झोकूनद्यायला हवे. यामुळे सर्वोत्तम यश मिळत असते. असे मत आशिष पाटील यांनी व्यक्त केले.
यश हेच एकमेव ध्येय
खेड्यात राहूनही यु.पी.एस.सी. सारख्या परीक्षेत खान्देशातीलविद्यार्थ्यांनी मिळविलेले यश खरोखरच प्रेरणादायी आहे. कोणत्याही सुखसोयीचा विचार न करता यश हेच एकमेव ध्येय मानून त्यासाठी सातत्यानेप्रयत्न करणारा व्यक्ती निश्चितच यशस्वी होत असतो असे मत गोपाल दर्जीयांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्तावित सौ. ज्योती दर्जी यांनीकेले. सुत्रसंचालन रामकृष्ण करंके व आभार भुषण पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दर्जी फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांनी सहकार्य केले.