स्पर्धा परिक्षेत धोका पत्करल्याशिवाय यश नाही

0

जळगाव। कोणत्याही क्षेत्रात यशोशिखर गाठण्यासाठी ध्येय ठरविणे महत्वाचे आहे. ध्येय ठरविल्यानंतर ध्येय प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात होते. ध्येय प्राप्तीच्या मार्गात अनेक अडचणी येतात, प्रसंगी धोका देखील पत्कारावा लागतो. परंतु धोका पत्करल्या शिवाय यशाच्या उंच शिखरापर्यत पोहोचू शकणार नाही. ध्येय प्राप्ती करतांना धोके स्विकारण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन डीआयजी सुहास वारके यांनी केले. जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी संचलीत ग.स. प्रबोधिनीच्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन रविवारी 11 रोजी झाले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आज स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. केवळ योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. सिव्हील सर्व्हिसेसच्या माध्यमातून लोकांची चांगली सेवा करता येते. समाजसेवेचे ते एक उत्तम मार्ग असल्याचे वारके यांनी सांगितले.

अपयशावर मात करा
प्रत्येकाने उच्च ध्येय ठरविले पाहिजे व ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. यश मिळेल की नाही याचा विचार न करता अविरत ध्येय प्राप्तीसाठी मार्गक्रमण करत रहावे अपयश हे येतच राहतात अपयशाला न घाबरता त्यावर मात करुन यशोशिखरापर्यत पोहोचला हवे. स्पर्धा परिक्षेत यश मिळाले नाही, तर दुसरा पर्याय निर्माण करून ठेवायला हवा किमान दुसर्‍या मार्गाने आपण जावून यशस्वी होवू शकतो. असा सल्ला कुलगूरू डॉ.पी.पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
ग.स.प्रबोधनीच्या उद्घाटन कार्यक्रमाला कुलगूरू डॉ. पी. पी. पाटील अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराडे, सहकार गटाचे अध्यक्ष बी. बी. पाटील, ग.स. सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम बोरोले, उपाध्यक्ष महेश पाटील, उदय पाटील, देवेंद्र पाटील, कर्ज समिती अध्यक्षा रागिणी चव्हाण, जे.डी.सी.सी. बँक संचालक डॉ.सुरेश पाटील, मनपा स्थायी समिती सभापती वर्षा खडके, व्ही.झेड.पाटील, एस.एस.पाटील, आर.एच.बावीस्कर, सुमन पाटील, मनोज पाटील, अजबसिंग पाटील, कैलासनाथ चव्हाण, सुनिल पाटील, अनिल गायकवाड, भाईदास पाटील, विलास नेरकर, जितेंद्र लाठी, सुनिल पाटील, शामकांत भदाणे, विश्‍वास सुर्यवंशी, यशवंत सपकाळे, विद्या पाटील, सुभाष जाधव, मंगेश भोईटे, संस्थेचे महाव्यवस्थापक नाना पाटील, रोहित निकम आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन अजबसिंग पाटील यांनी केले.