उपविभागीय अधिकारी शरद पवार यांचे प्रतिपादन
चाळीसगाव – स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर वाचनालाही महत्व द्यावे, अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना यश मिळण्यास मदत होत असल्याने विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन चाळीसगाव उपविभागाचे उप विभागीय अधिकारी शरद पवार यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय आणि चव्हाण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात लोकराज्य वाचक अभियानातंर्गत वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसिलदार कैलास देवरे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, राष्ट्रीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर. जाधव, प्रा.आर.पी. निकम, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, सचिव एम.बी.पाटील, पत्रकार परदेशी आदि उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी युवा माहिती दूतसाठी नोंदणी करावी- विलास बोडके
जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी लोकराज्य वाचक अभियानाचा उद्देश व महत्व विशद करत म्हणाले की, युवा माहिती दूत या उपक्रमाची माहिती दिली. व महाविद्यालयाच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी युवा माहिती दूत साठी नोंदणी करण्याचे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एस.आर. जाधव म्हणाले की, लोकराज्य मासिक हे सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. या मासिकात शासनाची उपयुक्त माहिती असते. या मासिकामुळे मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे. तसेच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन आधारकार्ड नोंदणी करुन आपली प्रोफाईल अपडेट करुन घ्यावी. शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी महाविद्यालयात लवकरच शिबीर घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मतदारांसाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर तसेच मतदारांसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1 सप्टेंबर पासून सुरु करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी पवार यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.
यावेळी तहसिलदार कैलास देवरे यांनी सांगितले, महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्यमासिक हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना वेग-वेगळे संदर्भ आपणास घ्यावे लागतात. लोकराज्य मासिकात शासनाच्या योजनांची माहिती, विविध विषयांवरील लेख, यशकथा, शासन निर्णय, मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णयांचा समावेश असतो. प्रत्येक महिन्याला वेगवेगळे विषय घेवून हे मासिक प्रसिध्द होत असतो. त्यामुळे लोकराज्य मासिक हे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या प्रत्येक विद्यार्थ्यांना उपुयक्त असल्याचेही तहसिलदार देवरे म्हणाले.
यशस्वितेसाठी यांचे परिश्रम
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रीय महाविद्यालयाचे प्रा.आर.पी.निकम यांनी केले. तर उपस्थितांचे आभार माहिती सहायक राजेंद सोनार यांनी मानले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालय यांच्यामार्फत लोकराज्य विक्री व सभासद होण्यासाठी स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलला विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश सानप, विनोद पाटील, दिलीप खैरणार, रामकृष्ण कोळी, अशोक मोराणकर यांनी परिश्रम घेतले.
-फोटो आहे