स्पर्धा परीक्षेच्या तपस्येत मग्न होऊन यशस्वी व्हावे

0

वरणगाव । युवा पिढीने स्पर्धा परीक्षेची तयारी करून देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे. देशाला आणखी प्रगतीकडे घेऊन जावे. त्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करा. ‘स्पर्धा परीक्षा एक तपस्या आहे त्यात व विद्यार्थ्यांनी मग्न होऊन यशस्वी व्हावे, असे प्रतिपादन प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले.

मराठा विद्या प्रसारक संस्थेला शंभर वर्ष पुर्ण झाल्यामुळे संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वरणगाव येथे अर्थशास्त्र विभागाद्वारे आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य अनंतराज पाटील, प्रा. अनिल शिंदे, डॉ. बडगुजर, डॉ. गायकवाड, प्रा. आजित कलवले, प्रा. मोरे, प्रा. दिनू पाटील, प्रा. पी.बी. देशमुख, प्रा. बी.बी. पाटील, वृशाली जोशी, प्रा. व्ही.ई. पाटील, प्रा. बी.जी. देशमुख, प्रा. ए. काटकर, लाड, संध्या निकम, एस.डी. पाटील, बाळासाहेब देशमुख, भोईटे, अतुल शेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.