स्पर्धेतून विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास

0

जळगाव । केवळ पुस्तकी ज्ञानावर समाधान न मानता व्यवाहारीक मुल्य व समाजातील घडामोडींचे परिक्षण करित आपल्या शैलीतुन परखडपणे निर्भिड विचार मांडण्याची कला आत्मसात करणारे विद्यार्थी उदयाचे यशस्वी व्यक्ती बनु शकतात असे ना.गुलाबराव पाटील यांनी प्रतिपादन केले.काळुंखे ट्रस्ट तर्फे जेष्ठ पत्रकार स्व.सितारामभाई काळुंखे यांच्या जयंतीनिमित्त आय.एम.ए.सभागृहात या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सायंकाळी पार पाडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना.गुलाबरावजी पाटील, प्रमुख अतिथी म्हणुन आर्या फाऊंडेशनचे संस्थापक डॉ.धर्मेंद्र पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.आश्विनीकुमार काळुंखे, परिक्षक प्रा.डॉ.सुरेश तायडे, डॉ.गोपी सोरडे, वैशाली पाटील यांची विशेष उपस्थिती होती. तसेच विद्यार्थी व त्यांच्या पालकांची उपस्थिती होती.

क्षमतेने सादरीकरण करणारा स्पर्धक महत्वाचा
ना. पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, केवळ वाचनावर भर देवून चालणार नाही तर आयत्यावेळेेवर उत्तम समयसुचकता वक्तृत्व स्पर्धाकाच्या अंगी असावी वेळेवर कोणतीही तयारी न करता सादरीकरण क्षमतेने करणार स्पर्धक महत्वाचा ठरतो. इतरांपेक्षा वेगळेपण जपून आपले अभ्यासपूर्ण दिसून आले पाहिजेत. आजच्या काळात उपलब्ध मुबलक साधनाचा वापर आजच्या पिढीने केला पाहिजे. तसेच समाजात जावून अन्यायाशी दोन हात करतांना निर्भिड वक्तृत्वाची उभारणी सामाजिक योगदानासाठी करवी अशा आक्रमक शैलित त्यांनी विद्यार्थ्यांपुढे अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी आपल्या मनोगतात त्यांनी हळुहळु एका पाठोपाठ एक प्रसंग मांडत उपस्थितीतांच्या मनाचा ठाव घेतला व विद्यार्थ्यांच्या गुणांना प्रोत्साहीत करणार्या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. सुत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.

यांना मिळाले पारितोषिक
सकाळच्या सत्रात स्पर्धेचा शुभारंभ डॉ.मिलींद कोल्हे, डॉ.आर.एम.पाटील व ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.आश्विनीकुमार काळुंखे यांच्या हस्ते प्रतिमा पुजनाने झाला. वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षण प्रा.डॉ.सुरेश तायडे, डॉ.गोपी सोरडे, वैशाली पाटील यांनी केले. यावेळी उपस्थितीत मान्यवर तसेच परिक्षकांना ट्रस्टतर्फे पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. यास्पर्धेत एक दिव्यांग विद्यार्थीनी व एक प्रज्ञाचक्षु विद्यार्थी सहभागी झाले होते व त्यांनी जिद्दीने पूर्णवेळ सादरीकरण करुन उत्तेजनार्थ पारितोषिके मिळविले. तसेच वक्तृत्व स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे-प्रथम-तृप्ती विलास देठे, द्वितीय- गणेश चंद्रकांत सावळे, तृतीय- प्रतिक गणेश महाले, उत्तेजनार्थ : श्रृती व्यंकट बोरसे, प्रतिक राजेश राऊत, अक्षय भाऊराव राऊत, पल्लवी जगन्नाथ शिंपी, नयन मनोहर पाटील आदी विद्यार्थ्यांना पारितोषिक पठकाविले.

यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी संजय बोंडे, हेमचंद्र काळुंखे, योगेश देशमुख, यशवंत चौधरी, दुर्गेश चौधरी, विजय डोहोळे, प्रसाद जोशी, रविंद्र भगत, संदेश राणे, ईश्वर छाजेड, नरेंद्र पाटील, योगेश काळुंखे, राजेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मनोज भांडारकर, विजय जाधव, उदय येशे, संजय जैन, शंकर विसराणी, गोपाळ चौधरी, ङ्गारूख तांबोळी, रत्नदिप काळुंखे, प्रकाश वाघ, दिपु कुकरेजा, विवेक सुर्यवंशी निलेश कुकरेजा, आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.