स्पायडर कॅम निकामी झाल्याने काही काळासाठी मैदानात उतरविले

0

बगळूरू । क्रिकेट सामन्यात प्रत्येक क्षण कॅमेरात कैद करणे अतिशय महत्त्वाचे असते. खेळपट्टीवर पंचांसाठी निर्णय देणे कठीण झाल्यानंतर तिसऱया पंचांचा म्हणजे रिव्ह्यूचा वापर केला जातो. याशिवाय, सामन्याचे सुस्पष्ट प्रक्षेपण होण्यासाठी अव्वल दर्जाचे आणि जास्तीत जास्त क्षमतेच्या लेन्स वापरल्या जातात. यामुळे क्रिकेट रसिकांना सामन्यातील प्रत्येक क्षण अगदी घर बसल्या टेलिव्हिजनवर अनुभवता येतो .

मात्र बंगणुरूत चौथ्या दिवशी स्पायडर कॅम निकामी झाल्याने त्याला काही काळासाठी मैदानात उतरविले होते.त्यामुळे पुढचा खेळ काही काळासाठी थांबला होता. ’‘स्पायडर कॅम’मुळे खेळाडूंनी लगावलेल्या मोठ्या फटक्यांना अडथळा निर्माण होणार नाही याचीही नियंत्रकांकडून काळजी घेतली जाते. पण बंगळुरूत झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीच्या चौथ्या दिवशी ‘स्पायडर कॅम’ निकामी झाल्याने सामन्यात काही काळ अडथळा निर्माण झाला होता. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर रेनशॉ फलंदाजी करत असताना स्टेडियमवरचा स्पायडर कॅमेरात तांत्रित बिघाड निर्माण झाला आणि तो सरळ खाली आला. कॅमेरा इतका खाली उतरला होता की पुढचा खेळ सुरू करणे शक्य नव्हते. मग काही मिनिटांच्या अडथळ्यानंतर कॅमेरा पुन्हा कार्यरत करण्यात आला आणि सामन्याला सुरूवात झाली.