‘स्पायडर मॅन’ची धडाकेबाज कारवाई

0

सोनी फिल्मचा स्पायडर मॅन अमेरिकेतील थिएटरमध्ये परतला असून बॉक्स ऑफिसवर १० कोटी ७० लाख डॉलरची धडाकेबाज कमाई त्याने केली आहे. ब्युटी अँड बिस्ट, गार्डीयन्स ऑफ गॅलेक्सी २ या फिल्म प्रमाणेच स्पायडर मॅनने बाजी मारली आहे.

सोनीने कोलम्बिया पिक्चर्स आणि मार्व्हल स्टुडिओ यांच्या बरोबरीने १७.५ कोटी डॉलर फिल्म बनविण्यासाठी खर्च केला. बॉक्स ऑफिस मोजो साईटच्या अंदाजानुसार सोनीने २५ कोटी डॉलरची कमाई जगभरातील बॉक्स ऑफसवर या घडीला केली आहे.

स्पायडर मॅनच्या कुटुंबस्नेही व्हर्जनमध्ये टॉम हॉलंडने पीटर पार्करचे काम केलंय. आयर्न मॅन रॉबर्ट डाउनीचा त्याला पाठिंबा आहे तो घातकी व्हल्चरला धडा शिकवण्यासाठी. दिग्दर्शक जॉन वॉटनेही नेहमी प्रमाणे लो बजेट फिल्म असुनही त्यात जान ओतलीय.