पाषाण । महाराष्ट्र स्केटिंग असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेसाठी पाषाणच्या स्पीड व्हील्स स्केटिंग क्लबच्या स्केटर्सची निवड करण्यात आली आहे. निगडीतील ठाकरे क्रीडा संकुलात झालेल्या रोलर हॉकी स्पर्धेत राज्यस्तरासाठी स्केटर्सची निवड करण्यात आली. त्यामध्ये स्पीड व्हील्स स्केटिंग क्लबच्या 14 स्केटर्सची नाशिक येथे होणार्या राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेकरीता वर्णी लागली.
रोलर हॉकी स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त (12 वर्षाखालील वयोगटात) मुलांमधून आरुष धायबर, अपूर्व भंगाले, शिवा कार्तिक, हिमांशू गोळे, ईशान चव्हाण, सार्थक मांडेकर, अवधूत राउत, आदी चौगुले या स्पर्धकांची वर्णी लागली. तर याच वयोगटात मुलींमधून आर्या गजरे, ओवी चव्हाण, निर्मिती ढमढेरे, त्रिशा सिंग, इशिता चव्हाण आदींची निवड करण्यात आली. तसेच 16 वर्षाखालील वयोगटात वरद टिपरे ह्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. स्केटिंग प्रशिक्षक अभिजित चौधरी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.