स्प्रिंग तुटल्याने भुसावळात पुष्पकचा 50 मिनिटे खोळंबा

0

रेल्वे कर्मचार्‍यांची सतर्कता ; दुरुस्तीनंतर अडीच वाजता गाडी रवाना

भुसावळ- मुंबईतील पावसामुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असतानाच बुधवारी अप 12533 लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसच्या गार्ड डब्यापासून तिसर्‍या क्रमांकाच्या जनरल डब्याचा स्प्रिंग तुटल्याचे गाडी स्थानकावर येत असताना एक्झामिनेशनमध्ये लक्षात आल्यानंतर तातडीने दुरुस्ती करण्यात आली. दुपारी 1.27 वाजता आलेली गाडी दुरुस्तीनंतर 2 वाजून 32 मिनिटांनी रवाना करण्यात आली. तब्बल 50 मिनिटे गाडीचा खोळंबा झाला.