राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सरकारला सवाल
आणीबाणीतील लोकांना पेन्शन देण्याच्या निर्णयावर शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी – नवाब मलिक
मुंबई – मिसा कायदयाअंतर्गत ज्यांना अटक झाले होते. त्या सगळ्यांना सरकार पेंन्शन देणार आहात का? कारण त्या काळामध्ये मिसाअंतर्गत हाजी मस्तान, मिर्झाही आत गेले होते. बरेचसे स्मगलरही आतमध्ये गेले होते. त्याकाळामध्ये सुक्कर नारायणन बक्करपण आत गेले होते. मग हे ठरवत असताना म्हणजे मिसामध्ये आत गेले काही लोकांवर मिसा लागल्यानंतर सगळे आता स्वातंत्र्यसेनानी होणार आहेत का? असा सवाल करत नवाब मलिक यांनी या सर्व मिसाबंदीना स्वातंत्र्यसेनानी करत असताना स्मगलरांना पण स्वातंत्र्यसेनानी करणार का? याचा सरकारने खुलासा केला पाहिजे अशी मागणी केली.
बाळासाहेबांची भूमिका चुकीची
हे देखील वाचा
आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्यांना पेंन्शन देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्यावेळी शिवसेनेची काय भूमिका होती आणि या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध होता की शिवसेनेने पाठिंबा दिला. जर पाठिंबा दिला तर बाळासाहेबांची भूमिका चुकीची होती हे शिवसेनेने स्पष्ट केले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.
कालच सरकारने आणीबाणीमध्ये मिसा कायदयाअंतर्गत जे तुरुंगात गेले त्यांना दहा हजार पेन्शन देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय होत असताना शिवसेनेची भूमिका काय होती हे शिवसेनेने स्पष्ट करावे . त्यावेळी आणीबाणी गरजेची आहे,आणीबाणी चांगली होती,आणीबाणीच्या बाजुने उभं राहण्याचं काम शिवसेनेने केले होते. आता पेन्शन देण्याचा निर्णय सरकार घेत असताना बाळासाहेबांनी आणीबाणीचे समर्थन केले होते ते चुकीचे होते काय हे शिवसेनेने पहिल्यांदा स्पष्ट करावे अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.
हा निर्णय देशातील स्वातंत्र्य चळवळीत भाजपची आरएसएस ही संघटना आहे तिचा सहभाग नसताना तरुणपिढीला कुठेतरी यांनीपण या देशासाठी काहीतरी केले आहे. त्याचा एक पुरावा तयार करुन ज्या स्वातंत्र्यसेनानीला जी पेंन्शन मिळते तशीच पेंन्शन यांना देवून ‘उंगली कटा के शहिदोंमें नाम लिखाना’, म्हणजे माझे बोट गेले त्यामुळे मीही शहीद झालो असं कुठेतरी काम या सरकारच्या माध्यमातून सुरु झालेले आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.