स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता बनविण्याची मागणी

0

चाळीसगाव । तालुक्यातील भोरस खु. व बु. हे गाव खासदार ए.टी.पाटील यांनी दत्तक घेतले असतांना देखील गावातील नागरिकांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता व नाल्याची अवस्था दयनिय असून नवीन बनविण्याची मागणी रयसेनेच्या वतीने ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.

रस्त्याच्या दूरावस्थेमुळे गावातील एखाद्याचे निधन झाल्यास प्रेत यात्रा स्मशानभुमी पर्यंत घेऊन जातांना खूप अडचणी येतात. नाल्याला पूल नसल्याने पावसाळ्यात मार्ग काढतांना अडचणी येतात, या समस्या सोडविण्यात याव्या अशी मागणी होत आहे. निवेदनावर जयदीप पवार, शरद पाटील, विजेंद्र जगताप, बापु जगताप, महेंद्र पाटील, संदिप पुजारी, दिनेश जगताप, भोलेनाथ पाटील, जयेश पाटील, विजय जगताप, सुनिल जगताप, योगेश पवार, सागर पवार, रविंद्र पाटील, सोमनाथ शिंदे, मंगेश पवार, ज्ञानेश्‍वर जगताप, अनवर खान, गोपाल देवकर यांच्यासह ग्रामस्थाच्या स्वाक्षर्‍या आहेत.