स्माईलेक्स – 2017 वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांची धमाल

0

शिरपूर । शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित एच. आर. पटेल औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात स्माईलेक्स-2017 हे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाले. स्नेहसंमेलनात महाविद्यालयातील सुमारे 140 विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. समाजप्रबोधनपर नाटिका, जनजागृतीपर मूकनाट्य, गीते, नृत्य, मनमोहक फँशन शो, लयबद्ध गायन, संगीत नाट्य अशा विविध प्रकारच्या रंगारंग कार्यक्रमांचे कलात्मक पद्धतीने सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक दत्तात्रेय पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. के. बी. पाटील यांनी भूषविले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. बारी, उपप्राचार्या डॉ. सविता पाटील,प्रा. योगिता गोयल, प्रा. वंदना पाटील, किशोर माळी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाचा वापर काळजीपूर्वक करावा व समाजविरोधी संदेश पसरवून सामाजिक अस्थिरता निर्माण करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक पवार यांनी केले.

स्नेहसंमेलन हे आपले कलागुणसादर करण्यासाठीचे व्यासपीठ असून विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे,यश व अपयश या नाण्याच्या दोन बाजू असून माणसाच्या प्रगतीसाठी दोन्हीही पूरकआहेत, अपयशाने खचून न जाता जिद्दीने सामोरे जावून यश साध्य करावे अशी प्रतिक्रिया डॉ. के. बी. पाटील यांनी दिली. वर्षभरात संपन्न झालेल्या विविध स्पर्धा व परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा व यशस्वी शिक्षकांचा सन्मान डॉ. के. बी. पाटील व दत्तात्रय पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यात महाविद्यालयातर्फे सुमारे 2,44,500/- रुपयांची एकूण55 पारितोषिके देण्यात आली. शुभम पाटील व मोहित महाले यांच्या समूहाने 26/11 च्या हल्ल्याचा व सीमेवरील युद्धजन्य परिस्थितीचा चित्तथरारक प्रसंग सादरकरीत सैनिकांच्या जीवनातील वास्तव्य प्रेक्षकांसमोर मांडून शहीदांना आदरांजली वाहिली. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा. पायल पाटील, प्रा. झमीर खान, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांच्या मार्गदर्शनात परिश्रम घेतले.