उरण : स्वातंत्र्य संग्रामातील चिरनेर जंगल सत्याग्रहात हौतात्म्य पत्करलेल्या आठ हुतात्म्यांची स्मारके उरण परिसरात उभारण्यात आली आहेत. अनेक स्मारकांच्या छताची सिमेंटची पत्रे फुटल्याने छतालाच गळती लागली आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे स्मारकांची दुरवस्था झाली आहे.