स्मार्ट फोन… स्मार्ट तंत्रज्ञान… अन् स्मार्ट युझर…

0

पॉवर बटन एंड कॉल : अनेकदा फोनवर बोलत असताना हाताचे पहिले बोट पॉवर बटनच्या जवळ असते. फोनवर बोलणे झाल्यावर फोन कानावरून काढतो. मग त्यानंतर कॉल एंड करतो. त्याचप्रमाणे अनेकदा काही महत्त्वाच्या बैठकीत असताना फोन येतो तेव्हा आपण फोनचे व्हायब्रेशन थांबवतो. मात्र फोन कट करू शकत नाही. अशा वेळी पॉवर बटनचा वापर करून आपण फोन कट करू शकतो. यासाठी तुम्हाला फोनच्या अ‍ॅक्सिसेबिलिटीमध्ये जाऊन पॉवर बटन एंड कॉल हा पर्याय सुरू करावा लागेल. तो सुरू केला की फीचर सुरू होते.

सेफमोड : ज्यावेळी आपल्याला फक्त फोन घेणे किंवा फोन करणे, तसेच लघुसंदेशाचे अ‍ॅप या गोष्टीच वापरायच्या असतील तर त्या वेळी सेफमोडचा वापर करू शकता. कॉम्प्युटरमध्ये ‘सेफमोड’ हा पर्याय आवर्जून पाहिला असेल. परंतु, स्मार्टफोनमध्ये सेफमोड म्हणजे बहुदा ऐकलेही नसेल. या मोडमध्ये इंटरनेट सुरू असते. फक्त यात फोनमध्ये प्ले स्टोअरवरून इंस्टॉल कलेले अ‍ॅप्स कार्यरत नसतात. अशावेळी केवळ इनबिल्ट अ‍ॅप्स वापरू शकतो. जी फोनद्वारे हा सेफमोड करण्यासाठी पॉवरऑफचे बटन दाबावे लागते त्यानंतर येणार्‍या पॉवरऑफचा पर्याय काही वेळ दाबून ठेवावा लागतो. त्यानंतर फोन सेफमोडवर जातो. हा सेफमोड काढण्यासाठी फोन पुन्हा
रिस्टार्ट करावा लागतो.

वेबपेजचे पीडीएफ : आज बहुतेक मोबाइल्समध्ये क्रोम हा ब्राऊझर वापरला जातो. इंटरनेटवर आपल्याला एखादा लेख आवडला आणि आपल्याला तो नंतर वाचायचा असेल तर आपण त्याची लिंक शेअर करून ठेवतो, पण शेअर केल्यावर ज्या वेळेस आपल्याला लेख वाचायचा आहे तेव्हा इंटरनेट जोडणी असणे आवश्यक आहे. जर ती नसेल तर तो लेख वाचू शकत नाहीत. म्हणून हा लेख पीडीएफ स्वरूपात सेव्ह करून ठेवल्यास तो ऑफलाइनही वाचू शकता. यासाठी तुम्हाला जे वेबपेज सेव्ह करायचे आहे ते सुरू करून त्यातील अ‍ॅड टू होम स्क्रीन हा पर्याय निवडावा. तो झाल्यावर शेअरचा पर्याय निवडा. मग त्यात सेव्ह अ‍ॅज पीडीएफ असा पर्याय येईल. तो निवडा. मग ते वेबपेज पीडीएफमध्ये सेव्ह होईल.

स्क्रीन पिनिंग : फोनचा वापर इतर कोणी करू नये, यासाठी अ‍ॅपलॉकचा पर्याय निवडता येतो. फोनला पॅटर्न लॉक किंवा न्यूमॅरिक्स पासवर्ड असतो. यानंतर प्रत्येक अ‍ॅपला अ‍ॅपलॉकच्या माध्यमातून पिन क्रमांक दिलेला असतो.हे सर्व करत असताना थर्डपार्टी अ‍ॅप डाऊनलोड करतात. हे अ‍ॅप्स मोबाईलला सुरक्षा देत असले तरी आपल्या माहितीची चोरी करत असतात. यामुळे अ‍ॅण्ड्रॉईडमध्ये स्क्रीन पिनिंगचा पर्याय आहे. यामध्ये जे अ‍ॅप पिनिंग करायचे असेल ते अ‍ॅप सुरू करा. मग सेटिंग्जमध्ये जाऊन स्क्रीन पिनिंगचा पर्याय सुरू करावा. मग रिसेंट अ‍ॅप्समध्ये जाऊन ज्या अ‍ॅपला पिनिंग करायचे आहे ते निवडावे आणि मग पिनिंग सुरू करा. त्यासाठी जो सोयीचा आहे तो पॅटर्न निवडा.

फाइल डिरेक्टरी : अनेकदा आपल्या फोनमध्ये फाइल मॅनेजरची सुविधा नसते. अशा वेळी आपण फाइल मॅनेजिंग अ‍ॅप्स डाऊनलोड करतो. मात्र हे सर्व अ‍ॅप्स आपली माहिती चोरी करतात. त्यांना आपल्या मोबाइलमध्ये किती फाइल्स आहेत. त्या कोणत्या प्रकाराच्या आहेत. त्याची एकूण साठवणूक क्षमता किती आहे इथपासून ते कोणती फाइल आपण किती वेळा सुरू केली व किती वेळा बंद केली हा सर्व तपशील समजत असतो. ही माहिती घेऊन ते त्यातून पैसेही कमवतात. असे असतानाच आपण अ‍ॅण्ड्रॉईड फोन मध्ये दिलेल्या महत्तवपूर्ण फीचरकडे दुर्लक्ष करतो. कालांतराने मात्र याचा फटकाही आपल्याला बसतो. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

सुनील आढाव – 7767012211