पिंपरी-चिंचवड । महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी विशेष उद्देश वहन (एसव्हीपी) कंपनीची बैठक येत्या आठवडाभरात घेण्यात येणार आहे. मात्र, स्मार्ट सिटीसाठी अद्याप सीईओची नेमणूक झालेली नसून, त्यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
हर्डीकर म्हणाले की, स्मार्ट सिटी योजनेच्या कामकाजासाठी एजन्सी नेमण्यात येणार आहे. त्या एजन्सीकडून स्मार्ट सिटीच्या डीपीआर बनविण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेत एरिया बेस डेव्हलमेंट आणि पॅन सिटी सोल्यूशन हे घटक महत्वाचे आहेत. त्यानुसार कामकाजाची सुरुवात करणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेकरिता निधीची उपलब्धता करण्यात येणार आहे. त्या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या एसव्हीपी संचालक मंडळाची लवकरच बैठक घेतली जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.