‘स्मार्ट सिटी’ अभियान; स्वतंत्र सेलची स्थापना

0

पिंपरी : स्मार्ट सिटी अभियानांतर्गतचे कामकाज विहित वेळेत पूर्ण करणे व कामकाजात गतिमानता येण्यासाठी ’स्मार्ट सिटी’ सेलची स्थापना करण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर हे सेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तर माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अख्यत्यारित जेएनएनयुआरएम, पंतप्रधान आवास योजना, अमृत अभियानाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘अ’ क्षेत्रिय कार्यालयाचे उपअभियंता लक्ष्मीकांत कोल्हे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.