स्मिता बागुल यांना समाजभुषण पुरस्कार

0

धुळे । डोंबवली येथील फाईन अकॅडमीच्या अध्यक्षा स्मिता बागुल यांनी गेल्या 25-30 वर्षांपासून कथक, लावणी या कलाप्रकाराचे प्रशिक्षण देवून आंतरराष्ट्रीय स्तरावर कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या कार्याचे दखल घेत श्रीसंत नरहरी महाराज प्रतिष्ठानतर्फे ‘समाजभुषण पुरस्कार 2017’ ने गौरव करण्यात आले. श्रीसंत नरहरी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारस देवपूरकर, सुप्रसिद्ध गायिका सुलोचना चव्हाण यांचे सुपुत्र विजय चव्हाण, समीर जगे, पारस देवपुरकर यांच्याहस्ते स्मिता बागुल यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीतर्फे दोन दिवस लावणी प्रशिक्षण कार्यशाळेचे नियोजन केले. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी नाविन्यपूर्ण कार्य केले.

अनुभव कथन
सुरेखा पुणेकर यांनी लोककला म्हणजे माणसाला पुढे नेणारी कला मानली जाते. नारायणगाव ते शिवाजी मंदिर व शिवाजी मंदिर ते अमेरिका हा प्रवास लावणीमुळे घडला असे लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी सांगितले. आराधना फाईन आर्ट अकॅडमीच्या वतीने लावणी नृत्यशाळेचे आयोजन स्मिता बागुल-मोरे यांनी केले. व्यासपिठावर सुरेखा पुणेकर, पारस देवपूरकर, विजय चव्हाण, स्मिता बागुल-मोरे , समीर जगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.