कोलकाता । ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने आपल्या ड्रिम टीमची निवड केली आहे. स्मिथच्या या संघात दोघा भारतीय क्रिकेटपटूंना स्थान मिळालेले असले तरी त्यात विद्यमान भारतीय कर्णधार विराट कोहलीचा समावेश करण्यात आलेला नाही. भारत दौर्यात ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करणार्या स्मिथच्या संघात दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि ऑफ स्पिनर हरभजन सिंगला स्थान मिळाले आहे. दुसर्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना स्मिथ म्हणाला की, विराटशी काही माझे वैयक्तिक शत्रुत्व नाही, पण सचिन आणि हरभजनचा संघात समावेश करेल. एक फिट संघ तयार करण्याचे श्रेय विराटला देईल.
विराट एक जबरदस्त खेळाडू आणि कर्णधार आहे. भारतीय संघाला वेगळ्या उंचीवर विराटने नेले आहे. स्मिथने आपल्या संघातील सलामीचे फलंदाज म्हणून डेव्हिड वॉर्नर आणि महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांची निवड केली आहे. याशिवाय वेगचान गोलंदाज मिशेल जॉन्सन आणि माईक हसीला त्याने संघात घेतले आहे.भारतात कसोटी मालिका जिंकणे हे स्मिथचे पुढचे लक्श्य आहे. स्मिथ म्हणाला की, दोन्ही संघामध्ये प्रदीर्घ काळापासून कसोटी क्रिकेटमधील यशासाठी रस्सीखेच सुरु आहे. एक कर्णधार म्हणून भारतात कसोटी मालिका जिंकायची आहे. भारतातील खेळपट्ट्या खूप वेगळ्या आहे. इथे अव्वल दर्जाचे क्रिकेट पहायला मिळते. सध्या सुरु असलेली एकदिवसीय क्रिकेटची मालिकाही त्याला अपवाद नाही.