स्मृतीदिनानिमित्त महात्मा गांधीजींना अभिवादन

0

भुसावळ । नसरवानजी फाईलमधील राजीव गांधी वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक कमिटीचे जिल्हाध्यक्ष मो. मुन्नवर खान, जिल्हा उपाध्यक्ष जे.बी. कोटेचा यांनी मनोगत व्यक्त केले. हुतात्मा दिनाबद्दल मौन पाळून शहिदांना श्रध्दांजली अर्पित करण्यात आली. याप्रसंगी सलिम गवळी, दलितमित्र लालाजी ढिवरे, अ‍ॅड. एम.एस. सपकाळे, आर.बी. भवार, दिपक जैन, विजय नरवाडे, यु.एल. जाधव, विनोद शर्मा, विनोद राठोड, विकास सपकाळे, अन्वर खान, महेबूब खान, सायराबानो, यास्मिनबानो, डॉ. कमलाकर चौधरी, चंद्रसिंग चौधरी, अकिल शाह, किसन बर्‍हाटे, संतोष बनसोडे, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.