स्मृती इराणींची चूक: जयंती शिवरायांची फोटो पोस्ट केला संभाजीराजेंचा !

1

मुंबई: आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशात साजरी होत आहे. राजकीय नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर सोशल मीडियावरून छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहून शिवजयंतीच्या शुभेच्छा देत आहे. भाजप नेत्या केंद्रीय मंत्री यांच्याकडून मात्र पोस्ट करताना एक चूक झाली आहे. स्मृती इराणी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो टाकण्याऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो पोस्ट केला आणि शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी पोस्ट डिलीट केली. मात्र काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. मुंबई काँग्रेसने या ट्विटचा स्क्रीन शॉट काढून स्मृती इराणींना लक्ष केले आहे.