स्मृती इराणी बाप्प्पाच्या चरणी

0

मुंबई: स्मृती इराणी ह्या मुंबईतील सिद्धिविनायकच्या दर्शनाल पायी चालत आल्या होत्या, त्यांच्या सोबत चित्रपट निर्मात्या एकता कपूर ह्या देखील होत्या. अमेठीमधून राहुल गांधी यांचा पराभव करत स्मृती इराणी या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. स्मृती इराणी, आणि एकता कपूर ह्या दोघी दर्शनाला १४ किमी पायी चालत गेल्या. एकता कपूर यांनी दोघींचा फोटो सोशल मिडीयावर शेयर केला आहे.

अमेठी मध्ये विजय संपादन करत स्मृती इराणी ह्या जायंट किलर ठरल्या होत्या. कॉंग्रेसचा गड त्यांनी काबीज केला आहे. हा विजय साजरा करण्यासाठी त्या आज बाप्पाच्या दर्शनाला आल्या होत्या. स्मृती इराणी आणि एकता कपूर ह्या दोघीहि १४किमि पायी चालत बाप्पाचे दर्शन घेतले. सोशल मिडीयावर फोटो शेयर करत, ‘सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी १४ किमी पायी चालत गेल्यावर चेहऱ्यावर आलेला टवटवीतपणा’ असे लिहले आहे.

एकता कपूरनं इन्स्टाग्रामवरही या सिद्धिविनायक दर्शनाचे काही व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्यापैकी एका व्हिडिओत ‘देवानं माझा नवस पूर्ण केला’ अशी प्रतिक्रिया देताना स्मृती इराणी दिसतात.